यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स | Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवी बासरी
बारा सोळा गौळ्याच्या नरी
त्या नटूनी चालल्या मथूरे बाजारी
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा
त्याने फोडिल्या घागरी
कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी
छेडू नको रे गोकूळ नगरी
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी
राधा झाली ग बावरी
कान्हा वाजवी बासरी
कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सृंगार
झाली चरणावरी
कान्हा वाजवी बासरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवी बासरी
Singer: Dilip Nayak